Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

धाराशिवचा ‘दोन तास अभ्यास’ फॉर्म्युला राज्यभर गाजतोय!

सायंकाळी ७ ते ९ टीव्ही-मोबाईल बंद; विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ग्रामपंचायतींचा ऐतिहासिक संकल्प

0 8 5 6 2 6

धाराशिवचा ‘दोन तास अभ्यास’ फॉर्म्युला राज्यभर गाजतोय!

सायंकाळी ७ ते ९ टीव्ही-मोबाईल बंद; विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ग्रामपंचायतींचा ऐतिहासिक संकल्प

धाराशिव | ज्ञानेश्वर गवळी

शिक्षणाला लोकचळवळीचे स्वरूप देणारा धाराशिव जिल्हा परिषदेचा ‘संध्याकाळी ७ ते ९ – अभ्यासासाठी दोन तास’ हा अभिनव उपक्रम आता राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. विद्यार्थ्यांचा मोबाईल आणि दूरचित्रवाणीवरील वाढता वेळ कमी करून अभ्यासाची सवय, कौटुंबिक संवाद आणि सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेला गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ७१२ ग्रामपंचायतींमध्ये दररोज सायंकाळी ७ वाजता भोंगा वाजताच दोन तासांसाठी दूरचित्रवाणी आणि मोबाईल बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या काळात विद्यार्थी अभ्यासात रमलेले दिसत असून, पालकही मुलांसोबत वेळ घालवत या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा देत आहेत. अनेक गावांमध्ये कुटुंबांनी मोबाईलमुक्त क्षणांचे छायाचित्रे आणि संदेश समाजमाध्यमांवर शेअर करून इतरांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ अंतर्गत राबविण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढविण्याबरोबरच कुटुंबातील संवाद, शिस्त, संस्कार आणि सामाजिक सहभाग दृढ करण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेचा हा प्रयोग आता राज्यासाठी आदर्श ठरत असून, शिक्षणासाठी समाजाने एकत्र येऊन उभारलेले हे लोकचळवळीचे मॉडेल देशभरातही प्रेरणादायी ठरू शकते, अशी भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे