Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिजामाता तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी सुजय शेळके

तुळजापूर येथे नवीन कार्यकारिणीची निवड; विविध पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली

0 8 5 6 2 0

जिजामाता तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी सुजय शेळके

तुळजापूर येथे नवीन कार्यकारिणीची निवड; विविध पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर येथील जिजामाता प्रतिष्ठान प्रणित जिजामाता तरुण गणेश मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच उत्साहात करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी सुजय शेळके, उपाध्यक्षपदी यश शिरसाट, सचिवपदी कुणाल शेळके तर कोषाध्यक्षपदी रितेश सरडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी मंडळाचे मार्गदर्शक सतीश शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. तसेच नगरसेवक चंद्रशेखर (माऊली राजे) भोसले, नगरसेवक मधुकर (भैय्या) शेळके, शेखर फुगारे, राहुल जाधव, राहुल जगताप, माऊली भोसले, किरण मोरे, पारस शेळके, आदित्य गोरे, आकाश गोरे, रोहित गायकवाड, अण्णा शिंदे, सुमित देशमाने, रोहित जाधव, वैभव सुरवसे, भैय्या भोसले, अभिषेक शिरसाट आणि मंगेश गोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. आगामी काळात सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम अधिक जोमाने राबविण्याचा निर्धार नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला. तुळजापूर शहरात युवकांना संघटित करून समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मंडळाचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे