Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापुरात भक्ती-शक्तीचा जागर! ‘श्री दत्त दुर्गा महाअनुष्ठानम्’चा भव्य आध्यात्मिक सोहळा; १००८ गुरुचरित्र पारायणासह विविध धार्मिक उपक्रम

शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर ते शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा धार्मिक उपक्रम पार पडणार आहे.

0 8 5 6 2 6

तुळजापुरात भक्ती-शक्तीचा जागर! ‘श्री दत्त दुर्गा महाअनुष्ठानम्’चा भव्य आध्यात्मिक सोहळा; १००८ गुरुचरित्र पारायणासह विविध धार्मिक उपक्रम

तुळजापूर : तुळजापूरनामा

भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम घडवणारा ‘श्री दत्त दुर्गा महाअनुष्ठानम्’ हा भव्य आध्यात्मिक सोहळा तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. गुरुतत्त्व प्रदीप परिवाराच्या वतीने शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर ते शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा धार्मिक उपक्रम पार पडणार आहे. विविध धार्मिक विधी, पारायण, पूजन आणि संस्कृती संवर्धनाच्या कार्यक्रमांनी तुळजापूरचे आध्यात्मिक वातावरण भक्तिमय होणार आहे.

या महाअनुष्ठानात १००८ श्री गुरुचरित्र पारायण, पंचकुंडात्मक सहस्र चंडीयाग, कुंकुमार्चन, सहस्र सुवासिनीं पूजन, कुमारिका पूजन, अन्नदान आणि पेयजल सेवा अशा विविध धार्मिक सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच जागरण-गोंधळ, भोंडला आणि संस्कृती संवर्धनाचे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.

हा भव्य सोहळा राम रेसिडेन्सी येथील इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या पाठीमागे, धाराशिव रोड, तुळजापूर येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात पार पडणार आहे.

या अनुष्ठानासाठी वाचक नोंदणी पूर्णपणे निःशुल्क असून, पारायण समितीच्या वतीने पोथीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : ७४१०१७५१८९ / ९४२३४०४१००

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे