Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

‘सैराट’ फेम अरबाज शेख यांच्या वडिलांच्या उपचारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची एक लाख रुपयांची मदत

मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात घेतली भेट; संकटसमयी शासनाकडून संवेदनशीलतेचे दर्शन

0 8 5 6 2 0

‘सैराट’ फेम अरबाज शेख यांच्या वडिलांच्या उपचारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची एक लाख रुपयांची मदत

मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात घेतली भेट; संकटसमयी शासनाकडून संवेदनशीलतेचे दर्शन

सोलापूर : आदित्य पात्रे

प्रसिद्ध मराठी चित्रपट ‘सैराट’ मधील ‘सल्या’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांवर सध्या सोलापूर येथील वळसंगकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या कठीण प्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेत त्यांच्या उपचारासाठी १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून, मदतीचा धनादेश अरबाज शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनीही सोलापूर येथील रुग्णालयात जाऊन अरबाज शेख व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी रुग्णाच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस करत उपचारांबाबत माहिती घेतली आणि आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने १,००,००० रुपयांचा धनादेश उपलब्ध करून दिला. वडिलांच्या उपचारासाठी ही मदत मोठा दिलासा ठरणार असून, त्यांच्या या संवेदनशील निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

संकटाच्या काळात एका उदयोन्मुख कलाकाराच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि दातृत्वाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे