ब्रेकिंगमहाराष्ट्र
लोकमान्य टिळकांनी समाजाला एकजुटीची दिशा दिली : नगरसेवक मधुकर शेळके
तुळजापूर नगरपरिषदेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात; नगरसेविका श्वेता साळुंखे यांच्या हस्ते अभिवादन
0
8
5
6
2
6
लोकमान्य टिळकांनी समाजाला एकजुटीची दिशा दिली : नगरसेवक मधुकर शेळके
तुळजापूर नगरपरिषदेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात; नगरसेविका श्वेता साळुंखे यांच्या हस्ते अभिवादन
तुळजापूर : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर नगरपरिषदेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरसेविका सौ. श्वेता वैभव साळुंखे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, डॉ. सतीश भोसले, नगरसेवक पंडितराव जगदाळे, नगरसेवक सागर कदम, नगरसेवक रत्नदीप भोसले, नगरसेवक मधुकर शेळके, वैभव सज्जनराव साळुंखे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

▪️‘सार्वजनिक गणेशोत्सवातून समाजाला केले संघटित’
यावेळी मनोगत व्यक्त करताना नगरसेवक मधुकर शेळके यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याला उजाळा दिला. ते म्हणाले, “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. समाजात एकजूट निर्माण करून स्वातंत्र्यलढ्याची भावना जनमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.”

लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत समाजाला संघटित केले. त्यांचे राष्ट्रप्रेम, संघर्षशील विचार आणि समाजाला एकत्र आणण्याचे कार्य आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी असल्याचे शेळके यांनी सांगितले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0
8
5
6
2
6



