ब्रेकिंगमहाराष्ट्र
बुगी-ऊगीच्या तालावर अपसिंग्याची तरुणाई थिरकली!
जय हनुमान मंडळाच्या नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; २२ स्पर्धकांचा सहभाग, आराध्या क्षीरसागर प्रथम

0
8
5
6
2
6
बुगी-ऊगीच्या तालावर अपसिंग्याची तरुणाई थिरकली!
जय हनुमान मंडळाच्या नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; २२ स्पर्धकांचा सहभाग, आराध्या क्षीरसागर प्रथम
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
गणेशोत्सवाच्या उत्साहाला सांस्कृतिक रंग देत तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील जय हनुमान तरुण मंडळाच्या वतीने आयोजित बुगी-ऊगी नृत्य स्पर्धेला कलाकार व रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मंडळाच्या व्यासपीठासमोर झालेल्या या स्पर्धेत तब्बल २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपल्या नृत्यकलेचे सादरीकरण केले. स्पर्धेच्या तालावर उपस्थित प्रेक्षकांनीही उत्स्फूर्त दाद दिली.

स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे डान्स मास्टर नवनाथ जनार्दन गोरे व प्रशांत दत्ता गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहायक सचिन जाधव, प्राध्यापक भाऊसाहेब निकम, डॉ. औदुंबर भाकरे, मंडळाचे माजी डान्समास्टर सूरदास गोरे, प्रा.दयानंद हाके आदी उपस्थित होते.

▪️आराध्याने पटकावले प्रथम पारितोषिक
अटीतटीच्या या नृत्य स्पर्धेत आराध्या क्षीरसागर हिने प्रथम क्रमांक पटकावला. प्रताप शिवाजी बनकर याने द्वितीय, तर काजल क्षीरसागर हिने तृतीय क्रमांक मिळवला. नंदिनी क्षीरसागर हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

स्पर्धेतील प्रथम पारितोषिक प्रा. भाऊसाहेब निकम यांच्यातर्फे, द्वितीय पारितोषिक कृष्णा एक्वा, अपसिंगाचे मालक बापू वडगावकर, तृतीय पारितोषिक सेवानिवृत्त सहशिक्षक बाळासाहेब गोरे, तर उत्तेजनार्थ पारितोषिक ॲड. तोफिक शेख यांच्यातर्फे देण्यात आले.
▪️मंडळाच्या कार्यकर्त्यांचे परिश्रम
गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम मंडळाने राबविला. स्पर्धेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे आयोजकांचा उत्साह वाढला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष वैजनाथ जनार्दन गोरे, उपाध्यक्ष अभिषेक राऊत, कोषाध्यक्ष वैजनाथ जनार्दन गोरे, सहसचिव सुदेश परमेश्वर नकाते, शिवशक्ती मंडाचे संस्थापक व सांस्कृतिक विभाग प्रमुख – पर्यवेक्षक (जेज) गोरोबा तोडकरी यांच्यासह मंडळाच्या कार्यकारिणी व सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.
गणरायाच्या उत्सवात बुगी-ऊगीचा जल्लोष; अपसिंग्यातील कलाकारांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!
0
8
5
6
2
6



