ब्रेकिंगमहाराष्ट्र
‘गोर सीकवाडी’च्या रजत महोत्सवासाठी बंजारा समाजाला एकजुटीचे आवाहन!
१६ ऑगस्टला धाराशिवमध्ये भव्य आयोजन; राष्ट्रीय गोरसेना जिल्हाध्यक्ष जगन्नाथ चव्हाण यांचे समाजबांधवांना निमंत्रण
0
8
5
6
2
0
‘गोर सीकवाडी’च्या रजत महोत्सवासाठी बंजारा समाजाला एकजुटीचे आवाहन!
१६ ऑगस्टला धाराशिवमध्ये भव्य आयोजन; राष्ट्रीय गोरसेना जिल्हाध्यक्ष जगन्नाथ चव्हाण यांचे समाजबांधवांना निमंत्रण
धाराशिव : प्रतिनिधी
गोर बंजारा समाजासह शोषित, पीडित, वंचित आणि बहुजनांच्या मान-सन्मान, न्याय व हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ‘गोर सीकवाडी’ या सामाजिक चळवळीला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवानिमित्त रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी हातलाई मंगल कार्यालय, बार्शी रोड, धाराशिव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नायक काशिनाथ यांच्या प्रयत्नातून २४ जून २००१ रोजी ‘गोर सीकवाडी’ या सामाजिक चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. गेल्या २५ वर्षांत या चळवळीने केवळ गोर बंजारा समाजापुरते कार्य मर्यादित न ठेवता शोषित, पीडित, वंचित आणि बहुजनांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या सामाजिक चळवळीच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशभरातील बंजारा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय गोरसेनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष जगन्नाथ चव्हाण यांनी केले आहे.
◾एकजुटीचा संदेश देणार महोत्सव
रजत महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, सामाजिक प्रश्नांवर चिंतन करणे आणि न्याय, हक्क व मान-सन्मानासाठी संघटितपणे पुढे जाण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी राज्यातील तसेच देशभरातील विविध क्षेत्रांतील समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असून, बंजारा समाजाने आपली सामाजिक एकजूट आणि ताकद दाखविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जगन्नाथ चव्हाण यांनी केले आहे.
“गोर सीकवाडीच्या २५ वर्षांच्या संघर्षमय वाटचालीचा गौरव करताना आगामी सामाजिक लढ्यासाठी नव्या ऊर्जेने एकत्र येऊया,” असा संदेशही आयोजकांच्या वतीने देण्यात आला आहे.

0
8
5
6
2
0



