ब्रेकिंगमहाराष्ट्र
चंद्राच्या जवळ भेटीसाठी आली ‘चांदणी’! गणेशोत्सवाच्या आगमन सोहळ्यात आकाशात अनोखे दृश्य; तुळजापुरात नागरिकांचे वेधले लक्ष
चंद्राच्या जवळ भेटीसाठी आली ‘चांदणी’! गणेशोत्सवाच्या आगमन सोहळ्यात आकाशात अनोखे दृश्य; तुळजापुरात नागरिकांचे वेधले लक्ष

0
8
5
6
2
6
चंद्राच्या जवळ भेटीसाठी आली ‘चांदणी’!
गणेशोत्सवाच्या आगमन सोहळ्यात आकाशात अनोखे दृश्य; तुळजापुरात नागरिकांचे वेधले लक्ष
तुळजापूर | प्रतिनिधी
दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास गणेशोत्सवाच्या आगमन सोहळ्यादरम्यान आकाशात चंद्राजवळ तेजस्वी चांदणी दिसून आली. गणरायाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असतानाच आकाशातील या मनमोहक दृश्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. एकीकडे ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि दुसरीकडे चंद्राच्या सान्निध्यात चमकणारी चांदणी, असा निसर्ग आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. अनेकांनी काही क्षण थांबून हे सुंदर दृश्य न्याहाळले. गणेशोत्सवाच्या उत्साहात आकाशातील या नयनरम्य दृश्याचीही नागरिकांमध्ये चर्चा रंगली.

0
8
5
6
2
6



