ब्रेकिंगमहाराष्ट्र
रात्रीच्या अंधारात म्हैस व रेडीवर चोरट्यांचा डल्ला!
अपसिंगा परिसरातील शेतातून ६५ हजारांचा जनावरांचा ऐवज लंपास; पोलिसांत गुन्हा

0
8
5
6
2
6
रात्रीच्या अंधारात म्हैस व रेडीवर चोरट्यांचा डल्ला!
अपसिंगा परिसरातील शेतातून ६५ हजारांचा जनावरांचा ऐवज लंपास; पोलिसांत गुन्हा
आपसिंगा : गणेश राजगुरु
तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे पुन्हा एकदा जनावरांची चोरी झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी शेतातून एक म्हैस व एक रेडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपसिंगा येथील संगिता अर्जुन क्षीरसागर (वय ३६) यांची अंदाजे ६५ हजार रुपये किमतीची एक म्हैस व एक रेडी ही जनावरे श्रीराम उर्फ सचिन गुलाबराव जाधव यांच्या बटईने केलेल्या शेतात बांधलेली होती. १ ऑगस्ट रोजी रात्री ते २ ऑगस्ट रोजी सकाळी या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी जनावरे चोरून नेली.
सकाळी जनावरे जागेवर नसल्याचे लक्षात येताच परिसरात शोधाशोध करण्यात आली. मात्र जनावरे न सापडल्याने संगिता क्षीरसागर यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ग्रामीण भागात जनावरांच्या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून, चोरट्यांचा लवकरात लवकर माग काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
0
8
5
6
2
6



