Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ढोकीत अमली पदार्थांच्या अड्ड्यावर ANTF चा छापा!

५० किलो ३५८ ग्रॅम गांजा, १३१ ग्रॅम चरससह ६९.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त; आलिशान बंगल्यात पत्त्यांचा क्लबही उघडकीस

0 8 5 6 2 0

ढोकीत अमली पदार्थांच्या अड्ड्यावर ANTF चा छापा!

५० किलो ३५८ ग्रॅम गांजा, १३१ ग्रॅम चरससह ६९.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त; आलिशान बंगल्यात पत्त्यांचा क्लबही उघडकीस

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF), छत्रपती संभाजीनगर विभागाने ढोकी येथे मोठी कारवाई करत गांजा व चरसाचा साठा जप्त केला. दि. १३ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ५० किलो ३५८ ग्रॅम गांजा, १३१ ग्रॅम चरस, सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६९ लाख १९ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

तेरणानगर, ढोकी येथील बाप्पा शंकर पवार यांच्या घरात अमली पदार्थांचा साठा असल्याची गोपनीय माहिती ANTF ला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सकाळी सुमारे ७.२० वाजता आरोपीच्या उपस्थितीत घराची झडती घेतली. झडतीदरम्यान घरात ठेवलेल्या गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. त्याचबरोबर चरस, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली.

◾आलिशान बंगल्यात अमली पदार्थांचा साठा?

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचा दुमजली आलिशान बंगला असून त्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, घराच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबवर पत्त्यांचा क्लब चालविला जात असल्याचेही कारवाईदरम्यान निदर्शनास आले. तेथे जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

◾गांजा-चरसाचा ‘सप्लायर’ कोण?

एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा व चरस आरोपीकडे कुठून आला? तो कोणाला विकला जात होता? या अमली पदार्थांच्या मागे आणखी कोणाचे जाळे आहे का? याचा तपास ANTFकडून सुरू आहे. या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराच्या मुळापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक अजित टिके आणि उप विभागिय पोलिस अधिकारी साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गीता बागवडे व त्यांच्या पथकाने केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे