Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! पिकअपची दोन दुचाकींना मागून धडक; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर

सुरतगावजवळ मध्यरात्रीच्या सुमारास काळाचा घाला; निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

0 8 5 6 2 6

तुळजापूर–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! पिकअपची दोन दुचाकींना मागून धडक; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर

सुरतगावजवळ मध्यरात्रीच्या सुमारास काळाचा घाला; निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

तामलवाडी | तुळजापूर नामा

तुळजापूर–सोलापूर मार्गावर सुरतगावजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. दोन दुचाकींना पिकअप वाहनाने मागून धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, तामलवाडी पोलिसांनी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मागून धडक; एकाचा दुर्दैवी मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अनिल सिद्राम मुद्देबिहाळ (वय २७, रा. न्यू पाच्छा पेठ, स्वातंत्र्य सैनिक नगर, ब्लॉक क्रमांक सी-३, सोलापूर) आणि त्यांच्यासोबत शिवलीग सतीश शिरूर, पंकज कृष्णदेव जाधव व संकेत राजकुमार बोडगे हे दोन दुचाकींवरून प्रवास करीत होते.

दरम्यान, सुरतगावजवळ पिकअप क्रमांक केए २८ एबी ५७३१ च्या चालकाने वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवून दोन्ही दुचाकींना मागून धडक दिल्याचा आरोप आहे. या अपघातात अनिल मुद्देबिहाळ गंभीर जखमी झाले. त्यांचा मृत्यू झाला, तर शिवलीग शिरूर, पंकज जाधव आणि संकेत बोडगे हे तिघे गंभीर जखमी झाले.

पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी मृत अनिल मुद्देबिहाळ यांचे वडील सिद्राम ईराप्पा मुद्देबिहाळ (वय ७२, रा. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात पिकअप चालक असिफ पिरमहमंद बेळगी (रा. वळसंगी, ता. निडगुंदी, जि. विजापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या अपघाताचा पुढील तपास तामलवाडी पोलीस करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे