ब्रेकिंगमहाराष्ट्र
धाराशिव जि.प.सीईओ डॉ. मैनाक घोष यांची सांगली जिल्हाधिकारीपदी बदली
धाराशिव जि.प.सीईओ डॉ. मैनाक घोष यांची सांगली जिल्हाधिकारीपदी बदली

0
7
6
4
9
7
धाराशिव जि.प.सीईओ डॉ. मैनाक घोष यांची सांगली जिल्हाधिकारीपदी बदली
धाराशिव : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे बदल करत धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष (भाप्रसे) यांची सांगली जिल्हाधिकारीपदी बदली केली आहे. या संदर्भातील आदेश सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी दि. २७ मार्च २०२६ रोजी जारी केला.शासन आदेशानुसार, सांगली जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले अशोक काकडे यांच्या जागी डॉ. घोष यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून ही बदली करण्यात आली आहे. तसेच डॉ. घोष यांच्या जागी श्रीम. प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान, डॉ. घोष यांनी सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून सांगली येथे नवीन पदाचा कार्यभार तात्काळ स्वीकारण्याच्या सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत.या बदलामुळे प्रशासनात नव्या घडामोडींना वेग येणार असून, संबंधित विभागांमध्ये कार्यपद्धतीत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0
7
6
4
9
7



