ब्रेकिंगमहाराष्ट्र
दमयंती फार्मस कंपनीच्या इलेक्ट्रिक डेपोमधून ६.५० लाखांचा माल लंपास; धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
7
6
5
0
5
दमयंती फार्मस कंपनीच्या इलेक्ट्रिक डेपोमधून ६.५० लाखांचा माल लंपास; धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील आळणी येथील दमयंती फार्मस प्रोड्युसर लिमिटेड कंपनीच्या इलेक्ट्रिक डेपोमधून अज्ञात चोरट्याने ऑईल व कॉपर वायर असा सुमारे ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा माल चोरून नेल्याची घटना दि. २३ जानेवारी २०२६ रोजी पहाटे १ ते दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
याप्रकरणी कंपनीचे कर्मचारी दयानंद खंडा गायकवाड (वय ५५, रा. बायपास रोड, प्रमिला नगर, धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. २४ जानेवारी २०२६ रोजी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०५ (ए) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.कंपनीच्या इलेक्ट्रिक डेपोमधील साहित्य चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेनंतर धाराशिव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली.
पोलिस पुढील तपास करीत आहेत.
0
7
6
5
0
5



