ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
चोरी रोखण्यासाठी तुळजापूर पोलिसांचे नागरिकांना जाहीर आवाहन !
धार्मिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपायांचे पालन करा-पोलीस विभागा मार्फत आव्हान
0
7
6
5
0
5
चोरी रोखण्यासाठी तुळजापूर पोलिसांचे नागरिकांना जाहीर आवाहन !
धार्मिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपायांचे पालन करा-पोलीस विभागा मार्फत आव्हान
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आगामी काळात विविध धार्मिक सण, उत्सव तसेच सार्वजनिक सुट्ट्यांचा कालावधी सुरू होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तुळजापूर पोलिस विभागाने नागरिकांना महत्त्वाचे सुरक्षा उपाय करण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस विभागाच्या माहितीनुसार,नागरिकांनी बाहेरगावी जाताना आपल्या घराची व संपत्तीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.घरातील मौल्यवान दागिने,रोख रक्कम कपाट, अलमारी, तिजोरी यासारख्या ठिकाणी ठेवू नये. कारण, चोरट्यांचे पहिले लक्ष्य हीच ठिकाणे असतात. त्यामुळे सर्व मौल्यवान वस्तू बँकेत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात,असे तुळजापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
तसेच बाहेरगावी जाताना आपल्या विश्वासू शेजाऱ्यांना व नातेवाईकांना माहिती द्यावी. अधूनमधून घराची पाहणी करण्यास सांगावे. घरातील व बाहेरील लाईट सुरु ठेवणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि “आपण सीसीटीव्हीच्या कक्षेत आहात” असे सूचनाफलक लावणे यामुळे चोरीस प्रतिबंध होतो,असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
घरातील सर्व सदस्य नोकरी वा व्यवसायानिमित्त बाहेर असतात, अशा घरांनी दिवसा सुद्धा जागरूक राहणे आवश्यक आहे. शेजाऱ्यांच्या मदतीने लक्ष ठेवावे. छोट्या व्यापारीपेठांमध्ये किंवा वसाहतींमध्ये वॉचमन ठेवून रात्री गस्त घालण्याची व्यवस्था करावी.
सध्या बाजारात घर व दुकानांच्या सुरक्षेसाठी मोबाईलशी जोडता येणारी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत. अशा साधनांचा वापर करून सुरक्षितता वाढवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
संकटाच्या किंवा संशयास्पद परिस्थितीत नागरिकांनी ११२ हा आपत्कालीन क्रमांक डायल करून तात्काळ पोलीस मदत मागवावी“काळजी घ्या, सुरक्षित रहा, नुकसान टाळा!”
0
7
6
5
0
5



