Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

डॉल्बी चालकांना पोलिसांचा जबर दणका; चार वाहनांवर ४० लाख ७४ हजारांचा दंड, धाराशिव “डॉल्बीमुक्त” होणार!

डॉल्बी चालकांना पोलिसांचा जबर दणका; चार वाहनांवर ४० लाख ७४ हजारांचा दंड, धाराशिव "डॉल्बीमुक्त" होणार!

0 7 6 5 0 5

डॉल्बी चालकांना पोलिसांचा जबर दणका; चार वाहनांवर ४० लाख ७४ हजारांचा दंड, धाराशिव “डॉल्बीमुक्त” होणार!

धाराशिव, :प्रतिनिधी

सार्वजनिक व खासगी कार्यक्रमांत कर्णकर्कश डॉल्बी -डिजेच्या आवाजामुळे वाढणाऱ्या ध्वनी व पर्यावरण प्रदूषणाला आळा घालण्यासाठी धाराशिव पोलिसांनी कठोर कारवाई करत डॉल्बी चालकांना जोरदार धक्का दिला आहे. शहरात नियमबाह्य आवाजात डॉल्बी वाजवणाऱ्या चार वाहनांवर तब्बल ४० लाख रुपयांचे हमी रक्षणपत्र व आरटीओकडून ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.दि. ६ जानेवारी रोजी हजरत खॉजा शमशोद्दीन गाजी (रहे) यांच्या उरुसानिमित्त शहरात डॉल्बी वाजवण्यात आले होते. मात्र ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज केल्याने संपूर्ण शहर दणाणून गेले होते. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चार डॉल्बी वाहने, साऊंड सिस्टिम व चालकांना ताब्यात घेण्यात आले. ध्वनी प्रदूषण, पर्यावरण संरक्षण तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली.प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने प्रत्येकी १० लाख रुपयांच्या हमी रक्षणपत्रावर वाहने तात्पुरती सुपूर्द केली असून,भविष्यात कोणत्याही प्रकारे डॉल्बी-डिजे वापरण्यावर कायमची बंदी घातली आहे. तसेच वाहन विक्री, बदल अथवा बेकायदेशीर वापरास मनाई करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर,अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या पथकाने केली.या न्यायालयीन आदेशामुळे धाराशिव शहर डॉल्बीमुक्त होण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकल्याचे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे