Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

खंडणी प्रकरणात पत्रकार सुनील ढेपे यांना जामीन मंजूर; ॲड. विशाल साखरे यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला निर्णायक

खंडणी प्रकरणात पत्रकार सुनील ढेपे यांना जामीन मंजूर; ॲड. विशाल साखरे यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला निर्णायक

0 7 6 5 0 5

खंडणी प्रकरणात पत्रकार सुनील ढेपे यांना जामीन मंजूर; ॲड. विशाल साखरे यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला निर्णायक

तुळजापूर | प्रतिनिधी

तुळजापूर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल खंडणी प्रकरणात आरोपी असलेले पत्रकार सुनील ढेपे यांना तुळजापूर येथील माननीय न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी सादर केलेला प्रभावी, ठोस व कायदेशीर युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरल्याने आरोपीची जामीनावर मुक्तता झाली.सदर प्रकरणात रिमांडच्या प्रत्येक टप्प्यावर ॲड. विशाल साखरे यांनी पोलिसांच्या अवास्तव कोठडीच्या मागणीला ठाम विरोध केला. प्रथम रिमांडवेळी पोलिस प्रशासनाने १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, ॲड. साखरे यांच्या सक्षम युक्तिवादामुळे माननीय न्यायालयाने फक्त २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.त्यानंतर दुसऱ्या रिमांडवेळी पुन्हा १० दिवसांची कोठडी मागण्यात आली. यावेळी देखील ॲड. साखरे यांनी स्पष्ट शब्दांत मांडले की, पोलिस कोठडीसाठी कोणतेही ठोस व संयुक्तिक कारण नसून ती मागणी अवास्तव आहे. युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने पोलिस व सरकारी वकिलांना कोठडीसाठी ठोस कारणे स्पष्ट करण्याचे निर्देश देत फक्त एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
जामीन अर्जावर युक्तिवाद करताना ॲड. विशाल साखरे यांनी स्पष्ट केले की, खंडणी मागणीचा आरोप तथ्यहीन आहे. तिसऱ्या व्यक्तीने, तिसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर फिर्यादीच्या सांगण्यावरून ५,००० रुपये दिल्याचा आरोप पूर्णतः खोटा व बनावट असल्याचा ठोस युक्तिवाद करण्यात आला. तसेच आरोपी सुनील ढेपे यांचे कोणतेही आर्थिक व्यवहार झाल्याचा पुरावा नसल्याचे दाखवण्यात आले.यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण दाखल्यांचा आधार घेत ॲड. साखरे यांनी, ड्रग्स प्रकरणासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे राजकीय व द्वेषपूर्ण हेतूने सदर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे देखील न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.सदर सर्व बाबींचा विचार करता न्यायालयाने ॲड. विशाल साखरे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत पत्रकार सुनील ढेपे यांना जामीन मंजूर करून मुक्त केले.या प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे, ॲड. विराज जगदाळे (विशेष सहकार्य), ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. संकेत गोरे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. अमित गोळे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, रोहित लोमटे, महेश पवार यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे