Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

करमाळ्यात भरतनाट्यम् नृत्यसंध्या व विद्यार्थी गुणगौरव उत्साहात संपन्न

करमाळ्यात भरतनाट्यम् नृत्यसंध्या व विद्यार्थी गुणगौरव उत्साहात संपन्न

0 7 6 5 0 5

करमाळ्यात भरतनाट्यम् नृत्यसंध्या व विद्यार्थी गुणगौरव उत्साहात संपन्न

करमाळा : अविनाश जोशी

येथील नृत्यशैली भरतनाट्यम् नृत्यालय यांच्या वतीने आयोजित भरतनाट्यम् नृत्यसंध्या व विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच केमिस्ट भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी मनोज राऊत, डॉ. अपर्णा भोसले, डॉ. सत्यपाल श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
करमाळ्यात शास्त्रीय नृत्य शिक्षिका मितवा श्रीवास्तव अग्रवाल यांनी मयुरीताई जोशी (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांपूर्वी भरतनाट्यम् नृत्यकलेची मुहूर्तमेढ रोवली. सूज्ञ पालक व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे आज हे छोटंसं रोपटं वृक्षात रूपांतरित होत असल्याचे चित्र दिसून येते.नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पहिली व दुसरी भरतनाट्यम् परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, तर सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते कौतुकपत्र देऊन गौरविण्यात आले.आपल्या मनोगतात मनोज राऊत यांनी सांगितले की, कला माणसाला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवते. कलेमुळे माणूस नैराश्यात जात नाही आणि अपयश पचवण्याची ताकद मिळते. अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन व कलाविष्कारालाही महत्त्व दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.डॉ. अपर्णा भोसले यांनी भरतनाट्यम् हा अत्यंत अभिजात नृत्यप्रकार असून सर्वांगीण विकासासाठी शास्त्रीय नृत्यसाधना आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात मितवा श्रीवास्तव अग्रवाल म्हणाल्या की, ही एक गुरु-शिष्य परंपरा असून नियम व शिस्तीत राहून नृत्यसाधना करणे सोपे नाही. मात्र कलेमुळे माणूस एकटा राहत नाही, तर तो एका उंचीवर पोहोचतो. पालक वालचंद माने यांनी मितवा अग्रवाल यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात जिजाऊ प्रशस्ती, अंगिकम्, नमस्कार, पुष्पांजली, लक्ष्मी स्तोत्र, गणेश वंदना आदी भरतनाट्यम् नृत्यप्रकार सादर करत विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी सूज्ञ पालकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बक्षिसांची अक्षरशः बरसात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
सूत्रसंचालन रेणुका दळवी यांनी प्रभावी शैलीत केले, तर आभार प्रदर्शन संचालिका व गझलकार मितवा अग्रवाल यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्यास मोठ्या संख्येने मान्यवर, पालक, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे