Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

आई तुळजाभवानीच्या जयघोषाने तुळजापूर दुमदुमले! शारदीय नवरात्रोत्सवाची चौथी माळ उत्साहात; वाघ वाहनावरून देवीचा छबिना

आई तुळजाभवानीच्या जयघोषाने तुळजापूर दुमदुमले! शारदीय नवरात्रोत्सवाची चौथी माळ उत्साहात; वाघ वाहनावरून देवीचा छबिना

0 8 5 6 3 3

आई तुळजाभवानीच्या जयघोषाने तुळजापूर दुमदुमले!

शारदीय नवरात्रोत्सवाची चौथी माळ उत्साहात; वाघ वाहनावरून देवीचा छबिना

तुळजापूर, : प्रतिनिधी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, बुधवारी (१४ ऑक्टोबर) देवींची नित्योपचार पूजा भक्तिभावात संपन्न झाली. नवरात्रोत्सवातील चौथ्या माळेनिमित्त मंदिर परिसरात भाविकांची श्रद्धा आणि भक्तीचा माहोल पाहायला मिळाला.

दरम्यान, मंगळवारी (१३ ऑक्टोबर) रात्री श्री तुळजाभवानी देवींची वाघ वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. देवीच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्याला मंदिर संस्थानचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, पुजारी, सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते.

या छबिना मिरवणुकीस जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्यासह मंदिर संस्थानचे विविध अधिकारी उपस्थित होते.

सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील, नागेश शितोळे, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, अमोल भोसले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, मंदिर संस्थानचे कर्मचारी, पुजारी, सेवेकरी आणि भाविकांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तुळजापूर नगरीत धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून, आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे