Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांचा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करा!

भाविकांच्या अर्पणातून शेतकऱ्यांसाठी ‘मदतीचा हात’ द्या; जनहित संघटनेचे तुळजाभवानी मंदिर संस्थानला निवेदन

0 8 5 6 3 3

नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांचा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करा!

भाविकांच्या अर्पणातून शेतकऱ्यांसाठी ‘मदतीचा हात’ द्या; जनहित संघटनेचे तुळजाभवानी मंदिर संस्थानला निवेदन

तुळजापूर, : प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला असून खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शारदीय नवरात्र महोत्सव २०२६मधील सांस्कृतिक कार्यक्रमांवर मोठा खर्च न करता मंदिर संस्थानच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी जनहित संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष अजय साळुंके यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तसेच तहसीलदार तथा व्यवस्थापक यांना दि. २८ सप्टेंबर रोजी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळाच्या सावटाखाली असून, हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

‘मातेच्या चरणी अर्पण झालेल्या पैशातून बळीराजाला आधार द्या!’

भाविक श्रद्धेने श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण करीत असलेल्या देणगी व निधीचा अनाठायी खर्च न करता संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपयोग करावा, अशी भूमिका जनहित संघटनेने मांडली आहे.

शारदीय नवरात्र महोत्सव हा धार्मिक श्रद्धेचा उत्सव असून, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सांस्कृतिक कार्यक्रमांवरील खर्चाला मर्यादा घालून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना प्रत्यक्ष मदत करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

‘अडचणीच्या काळात मंदिर संस्थानचा हात मदतीचा असावा’

दुष्काळाच्या कठीण काळात तुळजाभवानी मंदिर संस्थानने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल्यास भाविक आणि शेतकरी वर्गामध्ये सकारात्मक संदेश जाईल. “अडचणीच्या काळात मंदिर संस्थानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक हात मदतीचा मिळावा,” अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय साळुंके यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे