Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर हादरले! तलवार–कोयत्यांनी हल्ला, गोळीबारही; कुलदीप मगरवर जीवघेणा हल्ला !

भाजपचे उमेदवार पिटू गंगणेच्या आठ साथीदारांवर गुन्हा दाखल; पोलिसांची झटपट कारवाई

0 7 6 4 9 7

तुळजापूर हादरले! तलवार–कोयत्यांनी हल्ला, गोळीबारही; कुलदीप मगरवर जीवघेणा हल्ला !

भाजपचे उमेदवार पिटू गंगणेच्या आठ साथीदारांवर गुन्हा दाखल; पोलिसांची झटपट कारवाई

तुळजापूर | प्रतिनिधी

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात मंगळवारी सायंकाळी राजकीय द्वेषातून थरकाप उडवणारा हिंसाचार उघडकीस आला. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमर मगर यांचे चुलत बंधू कुलदीप मगर यांच्यावर तलवार, कोयते, चाकू आणि पिस्तुलातून गोळीबार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला.

या प्रकरणी भाजपचे उमेदवार विनोद पिटू गंगणे याच्या आठ साथीदारांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व शस्त्र अधिनियमान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत तात्काळ कारवाई केली आहे.

दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान कुलदीप दिलीप मगर (वय ४०, रा. एस.टी. कॉलनी, तुळजापूर) हे शेतातून घरी परतत असताना लोहिया मार्गावरील विठाई हॉस्पिटलसमोर दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांना अडवले.

सुरज नन्नु साठे व चेतन शिंदे यांनी थेट जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. त्यानंतर सागर गंगणे, शुभम साठे, शेखर गंगणे, नंदु गंगणे, बालाजी गंगणे व अतुल दळवी यांनी मगर यांना घेरून“तू विनोद पिटू गंगणेच्या विरोधात प्रचार का केला? तुला जिवंत सोडणार नाही!” अशी धमकी देत डोक्यावर, मानेवर, पाठीवर कोयत्याने व धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. या झटापटीत गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेण्यात आली.

हल्ल्यानंतर आरोपी जखमी कुलदीप मगर यांना उचलून विनोद गंगणे यांच्याकडे नेण्याच्या तयारीत असतानाच पोलीस गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला; मात्र जखमी अवस्थेतही मगर यांनी शुभम साठे व सागर गंगणे या दोघांना पकडून ठेवले, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

जखमी कुलदीप मगर यांच्यावर सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

फिर्यादीच्या जबाबावरून FIR क्र. 0509/2025 अंतर्गत खालील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे :
१) सुरज नन्नु साठे २) चेतन शिंदे ३) सागर किशोर गंगणे
४) शुभम साठे ५) शेखर किरण गंगणे ६) नंदु गंगणे
७) बालाजी गंगणे ८) अतुल दळवी ९) इतर अनोळखी इसम

आरोपींविरुद्ध BNS 2023 कलम 109 (जीवे मारण्याचा प्रयत्न), 189(2), 191(2), 191(3), 190 (बेकायदेशीर जमाव व दंगल) तसेच शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू असून, इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना कोणतीही माफी नाही, असा ठाम इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे