ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजाभवानी मंदिरात ‘महारुद्र महाभिषेक’; भक्तिभावाने रंगला अभिषेक सोहळा
श्रावण सोमवारनिमित्त पंचजन्य, पंचकल्याण, पंचमहाभूत अभिषेक; महिला भाविकांची मोठी गर्दी

0
8
5
6
3
0
तुळजाभवानी मंदिरात ‘महारुद्र महाभिषेक’; भक्तिभावाने रंगला अभिषेक सोहळा
श्रावण सोमवारनिमित्त पंचजन्य, पंचकल्याण, पंचमहाभूत अभिषेक; महिला भाविकांची मोठी गर्दी
तुळजापूर : प्रतिनिधी
पवित्र श्रावण सोमवारनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पंचजन्य, पंचकल्याण, पंचमहाभूत व महारुद्र महाभिषेक अभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे हे सहावे वर्ष असून, चैतन्यमय व भक्तिमय वातावरणात धार्मिक विधी संपन्न झाले.

श्रावण सोमवारचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या अभिषेक सोहळ्यासाठी देवीभक्तांसह तुळजापूर शहरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती. मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणामुळे मंदिर परिसराला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले होते.

या धार्मिक सोहळ्याचे आयोजन माजी नगरसेवक अंबरीश भैय्या जाधव यांच्या वतीने करण्यात आले. गेल्या सहा वर्षांपासून श्रावण सोमवारनिमित्त या अभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याने भाविकांमध्येही या उपक्रमाबद्दल उत्सुकता पाहायला मिळाली.
◾भक्तिभावात सहभागी झाले भाविक
महारुद्र महाभिषेकाच्या निमित्ताने भाविकांनी मातेच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. धार्मिक विधीच्या वेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिला भाविकांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली.
हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी अण्णासाहेब कदम, अमर चोपदार, नानासाहेब नाईकवाडी, अभिषेक जाधव, शिवाजी पवार, आनंद सावंत, शिवराज साठे, विकास भांगे, विनोद ठोंबरे, किरण बडुरे (कदम), अमोल सुरवसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
श्रावण महिन्यातील धार्मिक परंपरा आणि भक्तीभाव जपत आयोजित करण्यात आलेल्या या महारुद्र महाभिषेक सोहळ्यामुळे तुळजाभवानी मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.
0
8
5
6
3
0



