Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

व्हाईस ऑफ मीडियाची मोहोळ तालुका कार्यकारिणी जाहीर; जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरण

व्हाईस ऑफ मीडियाची मोहोळ तालुका कार्यकारिणी जाहीर; जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरण

0 7 6 4 9 7

व्हाईस ऑफ मीडियाची मोहोळ तालुका कार्यकारिणी जाहीर; जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरण

मोहोळ : व्हाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची मोहोळ तालुक्याची नूतन कार्यकारिणी सोलापूर जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
नूतन कार्यकारिणीत पद्माकर सोनटक्के यांची शहराध्यक्षपदी, सचिन दळवी यांची उपाध्यक्षपदी, नानासाहेब ननवरे यांची सचिवपदी, तेजस तिकुटे यांची खजिनदारपदी, सुहास परदेशी यांची प्रसिद्धी प्रमुखपदी, राहुल सोनवणे यांची सहसचिवपदी तर सचिन गवळी यांची संघटकपदी निवड करण्यात आली आहे.या कार्यक्रमास मंगळवेढा तालुकाध्यक्ष रोहिदास भोरकडे, जिल्हा कोर कमिटी सदस्य तथा पंढरपूर खजिनदार समाधान वनसाळे, ज्येष्ठ पत्रकार कैलास रणदिवे, बालाजी शेळके, मोहोळ तालुकाध्यक्ष विजय पुजारी तसेच तालुका कार्यकारिणी सदस्य भैय्यासाहेब कांबळे, दत्ता मिसाळ, दिनेश सातपुते, अशोक कांबळे, दत्तात्रय पांढरे, गोरक्ष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेतील विविध विषयांवर सखोल चर्चा करत पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले. नव्या कार्यकारिणीमुळे तालुक्यातील पत्रकार संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे