लोकमंगल तुळजापूर शाखेतील सोन्याच्या चोरी प्रकरणी चौकशीची मागणी — आरोपी व पोलिसांची नार्को टेस्ट व्हावी : इंटक काँग्रेस अध्यक्ष मधुकर शेळके
लोकमंगल तुळजापूर शाखेतील सोन्याच्या चोरी प्रकरणी चौकशीची मागणी — आरोपी व पोलिसांची नार्को टेस्ट व्हावी : इंटक काँग्रेस अध्यक्ष मधुकर शेळके
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शहरातील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोलापूर अंतर्गत असलेल्या तुळजापूर शाखेत झालेल्या सोन्याच्या चोरी प्रकरणात गंभीर वळण आले असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या शिपायासह सोन्याच्या दागिन्यांबाबत गहाळ करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना तहसीलदार तुळजापूर यांच्या मार्फत निवेदनद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,धाराशिव तालुक्यातील धारूर येथील आरोपी दत्ता नागनाथ कांबळे हा अतिशय हुशार आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थी असून, त्याला पोलीस प्रशासनाने पत्रकार परिषदेत आरोपी म्हणून न दाखवता त्याचे संरक्षण केले. त्याच्या ताब्यातील सोन्याच्या वस्तूंपैकी काही मौल्यवान दागिने गायब झाल्याचा संशय असून, ते कोणी आणि कशा प्रकारे गायब केले याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे शेळके यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
लोकमंगल तुळजापूर शाखेतून तब्बल दोन किलो चौख सोने चोरीस गेले असल्याची माहिती असून, या सोन्याच्या दागिन्यांचा ठावठिकाणा लावून ते सोसायटीकडे जमा करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपी व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट घेऊन सत्य बाहेर आणावे, तसेच राज्य शासनाने या प्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत, अशी ठाम मागणी मधुकर शेळके यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.




