Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

ट्रॅक्टर चोरी; माळुंब्रा गावात खळबळ !

ट्रॅक्टर चोरी; माळुंब्रा गावात खळबळ !

0 7 6 5 0 5

ट्रॅक्टर चोरी; माळुंब्रा गावात खळबळ !

तामलवाडी : प्रतिनिधी

माळुंब्रा (ता. तुळजापूर) येथून तब्बल ₹५ लाख ४० हजार किंमतीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

फिर्यादी अमर नवनाथ वडणे (वय २६, रा. माळुंब्रा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे कुबोटा कंपनीचे ऑरेंज रंगाचे ट्रॅक्टर (क्र. एमएच २५ डब्ल्यू २४७३) व त्यास जोडलेली ट्रॉली हे दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री १२.०० ते पहाटे ५.०० वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर उभे होते. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टरसकट ट्रॉली पळवून नेली.

या घटनेची माहिती मिळताच तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून भा.दं.वि. कलम ३०३(२) अन्वये तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेने शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चोरीच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे