Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मागणीला यश! पावणारा गणपती मंदिराजवळ एलईडी स्क्रीनची सुविधा

भाविकांना मिळणार श्री तुळजाभवानी मातेचे थेट दर्शन; बाळासाहेब भोसले, इंद्रजित साळुंके यांच्या पाठपुराव्याला यश

0 8 5 6 2 6

मागणीला यश! पावणारा गणपती मंदिराजवळ एलईडी स्क्रीनची सुविधा

भाविकांना मिळणार श्री तुळजाभवानी मातेचे थेट दर्शन; बाळासाहेब भोसले, इंद्रजित साळुंके यांच्या पाठपुराव्याला यश

तुळजापूर : प्रतिनिधी

शहरातील शुक्रवार पेठ परिसरातील भाविक आणि स्थानिक नागरिकांना श्री तुळजाभवानी मातेचे थेट दर्शन घेता यावे, यासाठी करण्यात आलेल्या मागणीला अखेर यश आले आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने श्रीमंतयोगी पावणारा गणपती मंदिराजवळ एलईडी स्क्रीन बसविण्यात आली असून, या सुविधेमुळे परिसरातील नागरिक व भाविकांना मोठा लाभ होणार आहे.

शुक्रवार पेठेतील पावणारा गणपती मंदिर परिसर, साळुंके गल्ली, भोसले गल्ली, खडकाळ गल्ली आणि मंकावती गल्ली हा पुजारीबहुल भाग आहे. या परिसरातील स्थानिक रहिवासी तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांना श्री तुळजाभवानी मातेचे थेट दर्शन उपलब्ध व्हावे, यासाठी बाळासाहेब भोसले आणि इंद्रजित साळुंके यांनी दि. २१ मार्च २०२५ रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे निवेदनाद्वारे एलईडी स्क्रीन बसविण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत मंदिर संस्थान आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने अखेर श्रीमंतयोगी पावणारा गणपती मंदिराजवळ एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे शुक्रवार पेठ परिसरातील नागरिकांसह भाविकांना आता श्री तुळजाभवानी मातेचे थेट दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

मागणी पूर्ण झाल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष विनोद (पिटूभैय्या) गंगणे, तहसीलदार माने, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, राजा कंपनी तरुण मंडळाचे अध्यक्ष तसेच या मागणीसाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे बाळासाहेब भोसले व इंद्रजित साळुंके यांनी आभार मानले आहेत.

वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर मागणी पूर्ण

भाविकांच्या सुविधेसाठी मार्च २०२५ मध्ये मांडण्यात आलेली मागणी प्रत्यक्षात पूर्ण झाल्याने शुक्रवार पेठ परिसरात समाधान व्यक्त होत आहे. “आज आपली आणखी एक महत्त्वाची मागणी पूर्ण झाली,” अशी भावना बाळासाहेब भोसले व इंद्रजित साळुंके यांनी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे