Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

बोंबले हनुमान चौक शुक्रवार पेठ येथून मारुती इको कार गायब;तुळजापूर मध्ये अज्ञात चोरट्यांकडून एक लाखांची कार लंपास

0 7 6 4 9 7

बोंबले हनुमान चौक शुक्रवार पेठ येथून मारुती इको कार गायब;तुळजापूर मध्ये अज्ञात चोरट्यांकडून एक लाखांची कार लंपास

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर शहरातील बोंबले हनुमान चौक शुक्रवार पेठ परिसरात उभी असलेली मारुती सुझुकी इको कार अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शुक्रवार पेठ येथील जलील रहमान शेख वय ५२ वर्ष यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादींची अंदाजे एक लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी इको एम.एच १२ एचझेड ०७०७ ही गाडी दि.२ डिसेंबर रोजी सायं. ४ वाजता ते ३ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान बोंबले हनुमान चौक शुक्रवार पेठ येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.परिसरातील पार्किंग असलेल्या जागेतून वाहन गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली.या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.तुळजापूर शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे. दरम्यान, पोलिसांनी वाहनमालकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास संबंधित बिट अमलदार करीत आहेत.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे