Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

यंदा कार्तिकी यात्रेसाठी ११५० जादा एसटी बसेस — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज!

0 7 6 4 9 7

यंदा कार्तिकी यात्रेसाठी ११५० जादा एसटी बसेस — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

राज्यभरातील भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) यंदाच्या कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त तब्बल ११५० जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.पंढरपूरच्या ‘चंद्रभागा’ बसस्थानकावर सज्ज तयारी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त दिनांक २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत अतिरिक्त बस वाहतूक केली जाणार आहे. पंढरपूरच्या ‘चंद्रभागा’ या विशेष बसस्थानकावर १७ फलाटांची व्यवस्था असून, सुमारे १००० बसेस पार्किंगसाठी सक्षम व्यवस्था करण्यात आली आहे.


यात्रेच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १२० पेक्षा जास्त एसटी कर्मचारी २४ तास हजर राहणार आहेत. वाहन दुरुस्ती व देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था तर बिघाड झालेल्या बस दुरुस्तीकरिता विशेष पथके शहराबाहेर तैनात केली जाणार आहेत.हिरकणी कक्षाची सोय
गरोदर माता व स्तनदा मातांसाठी बसस्थानकावर ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात आले असून, भाविकांसाठी पाणी, प्रकाश आणि शौचालयाच्या सोयींसह आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

गाव ते पंढरपूर थेट सेवा यात्रेच्या काळात ४० प्रवासी एकत्रित मागणी केल्यास त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या गट आरक्षणात महिलांना ५० टक्के तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत मिळणार आहे. प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून भाविकांनी आगाऊ आरक्षण करावे, असे आवाहन सरनाईक यांनी केले.मागील वर्षी ६ कोटींचे उत्पन्न मागील वर्षी कार्तिकी यात्रेदरम्यान एसटी महामंडळाने १०५५ जादा बसेसच्या माध्यमातून ३ लाख ७२ हजार प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली होती. यामुळे एसटीला तब्बल ६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
“भाविकांच्या सोयीसाठी एसटी सदैव तत्पर!”यंदाही लाखो भाविकांच्या सुरक्षित, आरामदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचे हजारो कर्मचारी रात्रंदिवस सेवेस तत्पर राहतील, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे