Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

महामार्ग सुरक्षा पथकाकडून ऊस वाहतूकदारांमध्ये जनजागृती; वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

0 7 6 5 2 2

महामार्ग सुरक्षा पथकाकडून ऊस वाहतूकदारांमध्ये जनजागृती; वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील धामणगाव रोडवरील श्रीवर्धन शुगर प्रा. लि. तसेच तुळजापूर शुगर प्रा. लि. येथे महामार्ग सुरक्षा पथकाच्या वतीने ऊस वाहतूकदार व वाहनचालकांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.

या जनजागृती कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता पटाईत (महामार्ग सुरक्षा पथक), पोलीस उपनिरीक्षक जाकेर पटेल, तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर, बीट अंमलदार जुबेर काजी तसेच गोबाडे (तामलवाडी पोलीस स्टेशन) यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान कारखान्याचे कार्यकारी संचालक, ऊस वाहतूक अधिकारी व सेक्रेटरी यांच्या उपस्थितीत सर्व ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक व बैलगाडी चालक तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

वाहनांवर रिफ्लेक्टर, रेडियम, टेल लाईट, इंडिकेटर, ब्रेक लाईट व पार्किंग लाईट अनिवार्यपणे लावणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

तसेच, दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. अपघात झाल्यास १०३३, ११२ किंवा १०८ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

महामार्ग सुरक्षा पथक आणि तामलवाडी पोलिसांनी संयुक्तरीत्या हा जनजागृती उपक्रम राबविला. हा उपक्रम दुपारी १.०० ते २.०० या वेळेत पार पडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे