ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
नवा चेहरा,नवं व्हिजन! राष्ट्रवादीचा जंगी दमदार शो-ॲड.मंजुषा साखरे यांच्या उमेदवारीने धाराशिवच्या रेषा बदलल्या ?
नवा चेहरा,नवं व्हिजन! राष्ट्रवादीचा जंगी दमदार शो-ॲड.मंजुषा साखरे यांच्या उमेदवारीने धाराशिवच्या रेषा बदलल्या ?
0
7
6
5
2
2
नवा चेहरा,नवं व्हिजन! राष्ट्रवादीचा जंगी दमदार शो-ॲड.मंजुषा साखरे यांच्या उमेदवारीने धाराशिवच्या रेषा बदलल्या ?
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नगराध्यक्ष पदाच्या रिंगणातील समीकरणे अक्षरशः बदलून टाकणारा आणि विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारा असा जंगी ताकद प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस आज प्रभावी शक्ती दाखवली. जिल्हा प्रवक्ते ॲड. विशाल साखरे यांच्या अर्धांगिनी, ॲड. मंजुषा साखरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या प्रचंड उपस्थितीत आणि जल्लोषाच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल केला.

शहराच्या राजकीय वातावरणात गेल्या काही दिवसांपासून “नवा चेहरा कोण?” हा प्रश्न वणव्याप्रमाणे पसरला होता. त्या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रवादीने आज जोरदारपणे दिले “चेहरा नवा… दिशा नवी!”
सुशिक्षित, कायदेपंडित, स्वच्छ प्रतिमा अशी ओळख असलेल्या ॲड. मंजुषा साखरे यांच्या एन्ट्रीनं धाराशिव नगरपरिषदेच्या निवडणुकीत नव्या लाटेचं प्रतिबिंब उमटू लागलं आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी निघालेला मिरवणुकीसारखा भव्य रोडशो हा पाहणाऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला. तरुणाई, महिला वर्ग, कार्यकर्त्यांची उसळलेली गर्दी… यामुळे विरोधकांवर अनैच्छिक मानसिक दबाव निर्माण झाल्याचं राजकीय पंडितांचे मत.विशेष म्हणजे, धाराशिवच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक अनेक वर्षांपासून जुन्या चेहऱ्यांच्या वर्चस्वात फिरत होती. पण यावेळी सुशिक्षित आणि कायदे पंडित पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराविषयी शहरभर उत्सुकता दिसत आहे. अनेक नागरिकांकडून “नवा चेहरा… चांगलं व्हिजन… आणि विकासाला प्राधान्य” अशी मागणी होत असताना ॲड. मंजुषा साखरे यांची एन्ट्री हा धाराशिव मध्ये गेमचेंजर ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विरोधक मात्र या लाटेखाली गळतीच्या सावटात सापडल्याचे चित्र दिसत आहे. काही प्रभागांत उमेदवार शोधण्याची धांदल, काही ठिकाणी उमेदवारी मागे घेण्याची चर्चा… हे सर्व पाहता, निष्ठावंत कार्यकर्त्यांपासून ते हवाहवेशीर अपक्षांपर्यंत अनेकांचे मनोबल ढासळल्याचे दिसत आहे.
यामुळे विरोधकांचे डिपॉझिटसुद्धा धोक्यात येऊ शकते, अशी चर्चा शहरभर रंगत आहे.

धाराशिवच्या राजकारणाला नवीन दिशा देणारं नेतृत्व म्हणून ॲड. मंजुषा साखरे यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं तर आश्चर्य वाटायला नको. पुढील काही दिवसांत ही लाट आणखी वेग घेणार की विरोधक यातून उभारी घेणार – हे पाहणं आता धाराशिवकरांसाठी उत्सुकतेचं ठरलं आहे!
0
7
6
5
2
2



