Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

कष्टकरी भटक्या कुटुंबांसोबत वाढदिवस आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद; १०० कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप

कष्टकरी भटक्या कुटुंबांसोबत वाढदिवस साजरा

0 8 5 6 2 6

कष्टकरी भटक्या कुटुंबांसोबत वाढदिवस

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद; १०० कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप

तुळजापूरनामा : धाराशिव

जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदा दिवाळीचा आनंद आपल्या वाढदिवसाच्यानिमित्ताने गरजू कुटुंबांसोबत साजरा करण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत समाजातील उपेक्षित आणि कष्टकरी घटकांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम शहरात राबविण्यात आला. पालावर राहून भटकंती करणाऱ्या १०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या दिवाळी किटचे वाटप करण्यात आले.

काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करणारे, दगड फोडून त्यांना विविध आकार देणारे, शेळीपालन तसेच फळविक्री,गुरे राखून,रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबियांना दिवाळीच्या निमित्ताने किराणा साहित्याचे किट भेट देण्यात आले. प्रामाणिकपणे रोजच्या रोज कष्ट करून आपल्या दोन वेळच्या जेवणाची सोय करणाऱ्या या कुटुंबांसाठी सणासुदीच्या काळात मिळालेली ही मदत बिकट काळात दिलासादायक ठरणारी आहे. दुष्काळाचा फटका केवळ शेतकरी कुटुंबांनाच नाही, तर रोजंदारीवर जगणाऱ्या आणि भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकरी घटकांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या अडचणींची जाणीव ठेवून दिवाळीचा मनसोक्त आनंद त्यांनाही मिळावा. दुष्काळी कालावधीत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे हिच आपल्याला जन्मदिवसाची सर्वात अनमोल भेट असल्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भटक्या विमुक्त कुटुंबाला ही मदत करण्यात आली आहे. मदतीचे स्वरूप लहान असले तरी त्यामागील भावना आणि सामाजिक जाणीव महत्त्वाची ठरली. मनोगत सिनगारे, डॉ. धीरज वीर, राजाभाऊ सोनटक्के, नगरसेवक राजाभाऊ पवार, रवी मुंडे आणि प्रणित सिनगारे यांच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील गरजू घटकांच्या आनंदात सहभागी होणे आणि अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे