Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तामलवाडी पोलिसांचे आणखी एक यश;ट्रॅक्टर चोरी प्रकरण उघड -८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त – सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकूळ ठाकूर

तामलवाडी पोलिसांचे आणखी एक यश;ट्रॅक्टर चोरी प्रकरण उघड -८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त - सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकूळ ठाकूर

0 7 6 5 1 9

तामलवाडी पोलिसांचे आणखी एक यश;ट्रॅक्टर चोरी प्रकरण उघड -८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त – सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकूळ ठाकूर

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तालुक्यातील माळुंब्रा येथील ट्रॅक्टर चोरी प्रकरणात तामलवाडी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून तब्बल ८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ट्रॅक्टर व ट्रॉली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, या कारवाईचे श्रेयं सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर आणि त्यांच्या पथकाला जात आहे.

दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे माळुंब्रा गावातील फिर्यादी वडणे यांचा कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीस गेल्याची तक्रार पोलीस ठाणे तामलवाडी येथे गु. र. नं. १४४/२०२५ कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, बार्शी शहर पोलिसांनी याच गुन्ह्यातील संशयित वैभव ज्ञानेश्वर फंड (२९, रा. सावरगाव, ता. तुळजापूर) व संजय जगन्नाथ शिरगीरे (३१, रा. गोंधळवाडी, ता. तुळजापूर) या दोघांना ताब्यात घेत ६ कुबोटा ट्रॅक्टर आणि एक मोटारसायकल असा मोठा मुद्देमाल जप्त केला होता. यामध्ये माळुंब्रा येथून चोरीला गेलेला ट्रॅक्टरही होता, असे तामलवाडी पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले.

पुढील तपासादरम्यान, तामलवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींना आपल्या ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी पाच ते सहा महिन्यांपूर्वी उळे गावातून जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर चोरी करून कर्नाटक राज्यातील विजापूर भागात विकल्याची कबुली दिली.
त्यानुसार तांत्रिक पुरावे आणि आरोपींच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर व चोरीतील ट्रॉली जप्त करण्यात यश मिळवले आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पो.उ.नि. प्रदीप टेकाळे, पो.अं. जुबेर काझी, दिनकर तोगे, गोपाळ सलगर, सुरज नरवडे, उमेश माने यांनी मोलाची भूमिका बजावली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या कुशल नेतृत्वाखाली तामलवाडी पोलिसांनी पुन्हा एकदा आपले तपास कौशल्य सिद्ध करत गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात यश मिळवले आहे. स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

2.2/5 - (4 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे