Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मध्ये इच्छुक उमेदवार औदुंबर कदम;”संधी दिली तर सोनं करीन”

आमदार राणाजगजितसिंह पाटील व युवा नेते विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिक जनसेवा

0 7 6 5 2 3

तुळजापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मध्ये इच्छुक उमेदवार औदुंबर कदम;”संधी दिली तर सोनं करीन”

आमदार राणाजगजितसिंह पाटील व युवा नेते विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिक जनसेवा

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मधील जनतेसाठी सदैव तत्पर, कार्यक्षम आणि विकासाभिमुख नेता म्हणून ओळख असलेले औदुंबर कदम यांनी पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी तयारी दर्शवली आहे.“संधी दिली तर संधीचं सोनं करीन” असा विश्वास त्यांनी तुळजापूरनामा न्यूजशी बोलताना व्यक्त केला. जिल्ह्याचे लोकप्रिय नेते व तालुक्याचे भाग्यविधाते आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि युवा नेता विनोद उर्फ पिटू गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली कदम दाम्पत्याने आपल्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक ६ मध्ये उल्लेखनीय विकास घडवून आणला आहे.

नगरसेविका सौ हेमाताई औदुंबर कदम यांच्या माध्यमातून औदुंबर कदम यांनी प्रभागातील नागरिकांसाठी रस्ते, नाल्या, पायऱ्या, सौरऊर्जेवरील हायमास्ट दिवे, रिटर्निंग वॉल, स्वच्छता उपक्रम,तसेच सिद्धार्थनगर,आराधावाडी, खुणटापळे व भीमनगर परिसरातील सुविधा उभारणीसाठी सातत्याने प्रयत्न केले.नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्यांना प्रतिसाद देत त्यांनी भीमनगर स्मशानभूमी उभारणीचे काम पूर्ण केले, तर आराधावाडी व परिसरातील रस्ते-दुरुस्ती व नाले बांधणीद्वारे नागरिकांना दिलासा दिला.

विशेष म्हणजे, या भागातील नागरिकांना रुग्णसेवेअभावी होणारा त्रास लक्षात घेऊन कदम यांनी बाळासाहेब ठाकरे रुग्णालय उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला. यामुळे आज स्थानिकांना शहरात जाऊन दवाखान्यात जाण्याची वेळ येत नाही. जनतेच्या आरोग्य, सुविधा आणि विकासाच्या बाबतीत सदैव जागरूक असलेले औदुंबर कदम यांनी समाजहितासाठी अनेक कामे राबविली.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी तब्बल पंचवीस वर्षांपासून प्रलंबित होती. या समाजहिताच्या कार्याची पूर्तता करून कदम यांनी समाज बांधवांचा सन्मान वाढवला. विकासकामांचा ठसा उमटवत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात त्यांनी यश मिळवले.

“मी आणि माझ्या पत्नीने नेहमी निस्वार्थ भावनेने जनतेची सेवा केली. विकासकामांतून प्रभागाला नवा चेहरा दिला आहे. नागरिकांच्या विश्वासाला पात्र राहून पुढेही प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा संकल्प आहे. जनतेने पुन्हा एकदा संधी दिली, तर त्या संधीचं सोनं करीन,” असा आत्मविश्वास औदुंबर कदम यांनी व्यक्त केला.

सध्या कदम प्रभाग क्रमांक दोन मध्ये वास्तव्यास असून तेथील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. विकासाचा वसा कायम ठेवत लोकसेवेच्या मार्गावर ठाम राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

4.7/5 - (3 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे