ब्रेकिंगमहाराष्ट्र
गोमुखतीर्थाच्या पवित्र जलाने आई तुळजाभवानी मंदिर परिसर स्वच्छ!
उद्या ११ ऑटोंबर दुपारी १२ वाजता घटस्थापना; शारदीय नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी तुळजापूर नगरी सज्ज

0
8
5
6
2
6
गोमुखतीर्थाच्या पवित्र जलाने आई तुळजाभवानी मंदिर परिसर स्वच्छ!
उद्या ११ ऑटोंबर दुपारी १२ वाजता घटस्थापना; शारदीय नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी तुळजापूर नगरी सज्ज
तुळजापूर : तुळजापूरनामा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोमुखतीर्थाच्या पवित्र जलाने श्री तुळजाभवानी देवीजींचे सिंहासन, भवानी-शंकर मंदिर परिसर तसेच मंदिर परिसर स्वच्छ धुऊन घेण्यात आला आहे.


◾ ११ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता घटस्थापना!
आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवातील महत्त्वाचा धार्मिक विधी असलेली घटस्थापना उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. या मंगल सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरात धार्मिक विधींची तयारी सुरू असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नवरात्रोत्सवात महाराष्ट्रासह विविध राज्यांतून लाखो भाविक तुळजापूरमध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर परिसराची स्वच्छता, धार्मिक परंपरांचे पालन आणि भाविकांच्या सुविधांना विशेष महत्त्व आहे. गोमुखतीर्थाच्या जलाने मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आल्याने नवरात्रोत्सवाच्या स्वागताची तयारी अधिक गतिमान झाली आहे.
भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेल्या या उत्सवासाठी तुळजापूर नगरी सज्ज होत असून, आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची आतुरता वाढली आहे. उद्याच्या घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाच्या धार्मिक सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.
0
8
5
6
2
6



