Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

भोकरदन, जाफराबादकरांकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात दीड टन धान्य आणि कौटुंबिक साहित्याचे वाटप !

0 7 6 5 0 5

भोकरदन, जाफराबादकरांकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात दीड टन धान्य आणि कौटुंबिक साहित्याचे वाटप !

कळंब : भिकाजी जाधव

तालुक्यात ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे तर प्रचंड नुकसान झालेच, मात्र काही गावांमध्ये घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य आणि संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले. या दुर्दैवी परिस्थितीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच, भोकरदन आणि जाफराबाद येथील दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला.

याआधीच सामाजिक कार्यकर्ते प्रभू गाढे, ग्रामसेवक लोखंडे, प्रा. वायाळ, विठ्ठल नाखोड यांच्या माध्यमातून सुमारे ४५ क्विंटल धान्य आणि आवश्यक साहित्य पाठवून मदत करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा झालेल्या मुसळधार पावसाने आणखी नुकसान झाल्याने, पुन्हा एकदा मदतमोहीम राबविण्यात आली.

पत्रकार परमेश्वर पालकर आणि विठ्ठल माने यांनी भोकरदन येथील लोकजागर सामाजिक संस्था चे संस्थापक अध्यक्ष केशव पाटील जंजाळ यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या पुढाकाराने मंगळवारी सकाळी तब्बल ८०० किट घेऊन मदतपथक कळंब तालुक्यात दाखल झाले.

या किटमध्ये गहू, तांदूळ, डाळी, तेल, रवा, साखर, ताट, तांब्या, साडी, ब्लॅंकेट अशा अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता. ही मदत एकूरगा, जवळा, पिंपळगाव (को.), भोगजी, आडसूळवाडी, ईटकूर, गंभीरवाडी, बोरगाव (ध) आदी गावांतील पुरग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

या उपक्रमावेळी केशव पाटील जंजाळ, प्रभू गाढे, गजानन फड, सचिन तेलंगरे, आदित्य सोनी, गौरव कुदर, साहेबराव गावंडे, भागवत कानडजे, नारायण जाधव, रामदास गाढे, राजू भवर, फकीरबा उबाळे, अशोक इचचे, दगडूबा सुसर, हसन चाऊस, चाऊस अली, भगवान महाराज इचचे हे शेतकरी बांधव उपस्थित होते.

मदतकार्य सुरळीत पार पडावे म्हणून राष्ट्रवादी उद्योग आघाडी (शरद पवार) चे जिल्हाध्यक्ष विठ्ठल माने, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, तसेच अभयसिंह आडसुळ, शिवाजी पाटील, धनंजय घोगरे, रामेश्वर जाधवर, रोहित आडसुळ आदींनी विशेष सहकार्य केले.या मदतीमुळे अनेक गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, पुरग्रस्तांनी भोकरदन व जाफराबादकरांच्या या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे