Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभाग वादात; अनियमिततेचा काळा खेळ उघड!

निकृष्ट कामे, बनावट हजेरीपत्रकं, ठेकेदारराजचा सुळसुळाट – जनतेच्या पैशावर उठला सवाल!

0 7 6 4 9 7

तुळजापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभाग वादात; अनियमिततेचा काळा खेळ उघड!

निकृष्ट कामे, बनावट हजेरीपत्रकं, ठेकेदारराजचा सुळसुळाट – जनतेच्या पैशावर उठला सवाल!

तुळजापूर : प्रतिनिधी

विकासाच्या नावाखाली जनतेची लूट आणि ठेकेदारांचा फायदा — हेच आता तुळजापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे ओळखचिन्ह ठरले आहे. विभागातील अनेक कामांमध्ये प्रचंड अनियमितता, निष्काळजीपणा आणि आर्थिक गैरव्यवहार उघड झाल्याने ग्रामविकासाच्या नावाने सुरू झालेल्या ‘ठेकेदारराज’चा काळा चेहरा समोर आला आहे.

काम सुरू होण्याआधीच हजेरीपत्रकं पूर्ण, मोजमाप न करता ठेके मंजूर, आणि विना देखरेख बिले पास — या ‘कागदी विकासा’च्या कसरतीत लाखो रुपये वाऱ्यावर उडाले आहेत. काही अभियंते आणि अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या दबावाखालीच फाईल्स फिरवल्या, अशी कुजबुज प्रशासनातच रंगत आहे.

जनतेचा विकास नव्हे, ठेकेदारांचा फायदा — हाच उद्देश दिसतोय असा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अनेक सर्कल विभागांतील अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या कामांनी या विभागाचा कारभारच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

बांधकाम विभागातील “काळेचे कारणामे”हेच या सर्व गैरप्रकारांचे मूळ असल्याचे बोलले जात असून, या कारणाम्यांवरूनच कामांचे दरवाजे उघडतात,अशी चर्चा आहे.

उच्च अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

“हा विकास नाही, तर जनतेच्या पैशावर चाललेला ठेकेदारांचा खेळ आहे!”

तुळजापूर पंचायत समितीचा बांधकाम विभाग म्हणजे ‘सोन्याची कोंबडी’ ठरला असून, त्यातून काही जण आपले खिसे भरत आहेत — आणि जनतेचा विश्वास मात्र दररोज खचत चाललाय.

3.5/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे