Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अपघातस्थळी माणुसकीचा झेंडा! पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी दाखवली तत्परता, दुचाकीस्वाराचे प्राण वाचवले

प्रोटोकॉल बाजूला, माणुसकी पुढे! प्रताप सरनाईकांची तत्परता, जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल

0 7 6 4 9 7

अपघातस्थळी माणुसकीचा झेंडा! पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी दाखवली तत्परता, दुचाकीस्वाराचे प्राण वाचवले

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे २६ जानेवारी २०२६ रोजी धाराशिव दौऱ्यावर असताना सोलापूर–तुळजापूर रस्त्यावर अचानक दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला. मंत्री सरनाईक यांचा ताफा त्या मार्गाने जात असतानाच हा प्रसंग घडला.

अपघातग्रस्त तरुण रस्त्यावर विव्हळत पडलेला पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ताफा थांबवण्याचे आदेश दिले. कोणताही प्रोटोकॉल न पाळता त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि जखमी दुचाकीस्वाराला ताफ्यातील गाडीत बसवून तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले. केवळ वैद्यकीय मदतच नव्हे, तर जखमीच्या डोळ्यात भीती पाहून त्यांनी मायेचा शब्द, धीर देणारा हात आणि विश्वासाचं बळ दिलं. काळजी करू नकोस, आम्ही आहोत,असे शब्द जखमीसाठी दिलासा ठरले.या घटनेमुळे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माणुसकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सत्ता, पद आणि ताफा बाजूला ठेवून सामान्य नागरिकाच्या मदतीला धावून जाणं हेच खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, अपघातस्थळी दाखवलेली तत्परता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे