ब्रेकिंगमहाराष्ट्र
बनावट देशी दारू कारखान्यावर पोलिसांची धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश; १ कोटी ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
7
6
4
9
6
बनावट देशी दारू कारखान्यावर पोलिसांची धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश; १ कोटी ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : ज्ञानेश्वर गवळी
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पोलिसांनी ऐतिहासिक कारवाई करत बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्रे शिवारात सुरू असलेला हा अवैध कारखाना पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आला. या कारवाईत तब्बल १ कोटी ५४ लाख ९ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हाभर कडक पेट्रोलिंगचे आदेश दिले होते. त्यानुसार २४ जानेवारी २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली वळसंग पोलिसांनी मद्रे–आहेरवाडी रस्त्यावर संशयास्पद आयशर टेम्पोवर छापा टाकला. तपासात पत्र्याच्या गोडाऊनमध्ये विनापरवाना चालणारा बनावट देशी दारू कारखाना उघडकीस आला.या कारवाईत स्वयंचलित चार मशिन्स, १२२ बॅरल कच्चे रसायन, मोकळ्या बाटल्या, झाकणांचे बॉक्स, तयार बनावट देशी दारू व वाहतूक वाहन जप्त करण्यात आले. मुख्य आरोपी राजू उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर याला अटक करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कडक धोरणामुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांना जोरदार आळा बसत असून, भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा विश्वास नागरिकांत व्यक्त होत आहे.
0
7
6
4
9
6



