Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

एकाच टेबलावर वर्षानुवर्षे ‘राजकारण’; पंचायत समितीतील ‘टेबलराज’ उघडकीस!

तालुक्यातील नागरिकांची नजर नूतन गटविकास अधिकाऱ्यांकडे

0 7 6 5 0 5

एकाच टेबलावर वर्षानुवर्षे ‘राजकारण’; पंचायत समितीतील ‘टेबलराज’ उघडकीस!

तालुक्यातील नागरिकांची नजर नूतन गटविकास अधिकाऱ्यांकडे

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर येथील पंचायत समिती कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचा ‘एकाच टेबलावर’ वर्षानुवर्षे जम बसलेला आहे. पद बदलले, अधिकारी गेले, गटविकास अधिकारी बदलले — पण काही टेबलधारी मात्र हलले नाहीत! त्यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे.“या टेबलावर एवढं सोनं आहे का?”

अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समितीतील काही अधिकारी हे एका ठराविक टेबलावर गेली अनेक वर्षे कायम बसलेले आहेत. या टेबलावरूनच ठरतो निर्णय — कोणती फाईल पुढे जाणार, कोणती थांबणार, कोणती ‘त्रुटी’ दाखवायची आणि कोणती ‘ओके’ करायची!

‘वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाखाली’ पैसे उकळणे, फाईल पुढे ढकलण्यासाठी दलालांमार्फत व्यवहार करणे, आणि ज्याने पैसे दिले त्याची फाईल ओके – ज्याने नाही दिले त्याची अडकवून ठेवण्यात येणार असा कारभार चालत असल्याचे आरोप नागरिकांमध्ये चव्हाट्यावर आले आहेत.

पंचायत समितीतील महिला कर्मचारी, अभियंते, आणि इतर अधिकारी यांच्यातील या “किंगमेकर”ची ओळख सर्वांना माहित असूनही कोणीही तोंड उघडत नाही, कारण ‘टेबल’ म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाली आहे. काही भुरटे पुढारी आणि संघटना यामागे असल्याने हा भ्रष्ट साखळी कारभार आजवर सुरू आहे, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.

आवक-जावक विभागातून निघालेल्या फाईली काही वेळा थेट संबंधित टेबलावरच जातात, त्रुटी नसतानाही मुद्दाम काढल्या जातात आणि पैसे दिले की “फाईल ओके” ठरते. यामध्ये संबंधित अधिकारी आणि काही अभियंते सहभागी असल्याची नागरिकांमध्ये कुजबुज आहे.आता प्रश्न असा की — नूतन गटविकास अधिकारी या ‘टेबलराज’वर कारवाई करणार का? अनेक वर्षे एकाच टेबलावर बसून कारभार चालवणाऱ्यांचा खुट्टा उपसला जाणार का ? तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या नजरा आता पंचायत समितीच्या नव्या गटविकास अधिकाऱ्यांकडे खिळल्या आहेत.कारवाई होईल की पुन्हा ‘टेबलवरचं राज्य’ कायम राहणार?

 

2/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे