भाऊबीज निमित्त तुळजापूर शहरातील लाडक्या बहिणींसाठी मोफत eKYC शिबिर
मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण" योजनेअंतर्गत भावाकडून बहिणींना खास दिवाळी भेट!
भाऊबीज निमित्त तुळजापूर शहरातील लाडक्या बहिणींसाठी मोफत eKYC शिबिर

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत भावाकडून बहिणींना खास दिवाळी भेट!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
भाऊबीजच्या शुभमुहूर्तावर तुळजापूर शहरातील लाडक्या बहिणींना एक खास भेट मिळणार आहे. मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत शासनाने अनिवार्य केलेल्या eKYC प्रक्रियेसाठी मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या उपक्रमाची माहिती देताना श्री सुशांत (बाळासाहेब)भोसले यांनी सांगितले की,“तुळजापूर शहरातील सर्व पात्र महिला भगिनींनी शासनाच्या निर्णयानुसार eKYC करणे अत्यंत आवश्यक आहे.ज्या बहिणींनी अद्याप eKYC केलेले नाही, त्यांनी या भाऊबीज दिवशी आयोजित मोफत शिबिराचा लाभ घ्यावा.”
हे शिबिर दि. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत बाळासाहेब भोसले यांच्या हॉलमध्ये (भोसले गल्ली, तुळजापूर) आयोजित करण्यात आले आहे.महिलांनी या शिबिरासाठी स्वतःचे आधारकार्ड तसेच पतीचे किंवा वडिलांचे आधारकार्ड कागदपत्रासह उपस्थित राहावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.“जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू देत, भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे,”अशा भावनिक शब्दांत श्री. सुशांत भोसले यांनी या उपक्रमाची भावना व्यक्त केली.
◾अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 श्री अभिजीत पाटील – 76208 43535
आगामी काळात विभागनिहाय शिबिरेही आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही तुळजापूरनामा न्युजशी बोलताना सांगितले.



