ब्रेकिंगमहाराष्ट्र
ट्रक चालकाला मारहाण प्रकरणी दोन पोलिस निलंबित सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची तात्काळ कारवाई
ट्रक चालकाला मारहाण प्रकरणी दोन पोलिस निलंबित सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची तात्काळ कारवाई

0
7
6
5
0
5
ट्रक चालकाला मारहाण प्रकरणी दोन पोलिस निलंबित सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची तात्काळ कारवाई

सोलापूर : राजीव पुजारी
पंढरपूर शहरात ट्रक चालकाला मारहाण केल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दोन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
दि. ३ मार्च २०२६ रोजी पंढरपूर शहरातील मंगळवेढा नाका परिसरात वाहतूक पोलिसांकडून एका ट्रक चालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची चर्चा सर्वत्र होत असतानाच हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित करण्यात आला होता.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले. चौकशीदरम्यान संबंधित दोन पोलीस अंमलदारांनी कर्तव्यावर असताना बेशिस्त वर्तन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांना तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोलीस दलाची प्रतिमा स्वच्छ आणि पारदर्शक राहावी, तसेच नागरिकांशी वागताना संयम आणि कायद्याच्या चौकटीचे पालन करणे आवश्यक असल्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षकांनी अधिनस्थांना दिल्या आहेत. कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा नागरिकांशी अयोग्य वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, या कारवाईमुळे पोलिस दलात शिस्तीबाबत स्पष्ट संदेश गेल्याची चर्चा सुरू आहे.
0
7
6
5
0
5



