ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
पंचायत समिती तुळजापूर म्हणजे मिनी मंत्रालय; काही अधिकारी ढेकणासारखे खुर्चीला चिकटलेले!
नूतन गट विकास अधिकारी खांदे पालट करणार का ?
0
7
6
4
9
9
पंचायत समिती तुळजापूर म्हणजे मिनी मंत्रालय; काही अधिकारी ढेकणासारखे खुर्चीला चिकटलेले!

नूतन गट विकास अधिकारी खांदे पालट करणार का ?
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
पंचायत समिती तुळजापूर हे तालुक्यातील “मिनी मंत्रालय” म्हणून ओळखले जाते. मात्र या मंत्रालयात काही अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात खुर्चीला ढेकणासारखे चिकटून बसलेले आहेत! त्यामुळे विकासाच्या गतीला ब्रेक लागल्याची चर्चा जनतेत जोरात सुरू आहे.
आस्थापना विभागात सात ते आठ वर्षे, घरकुल विभागात नऊ ते दहा वर्षे, आवक विभाग व कनिष्ठ प्रशासन अधिकारी सहा ते सात वर्षे, तर ऑपरेटर तब्बल दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी आहेत. सहाय्यक प्रशासन अधिकारीसुद्धा सात ते आठ वर्षे त्याच खुर्चीवर बसलेले आहेत.
अनेक अधिकारी एकाच विभागात चार ते पाच वर्षांपासून चिकटून बसल्याने “सोन्याची अंडी देणारी कोंबडी” जपल्याची भावना निर्माण झाली आहे. या गटातील काहींचा प्रभाव इतका आहे की, विभाग बदलाची फाइलदेखील टेबलवरच धूळ खात आहे.
नुतन गट विकास अधिकाऱ्यांसमोर आता मोठे आव्हान उभे आहे — हे ढेकणासारखे बसलेले अधिकारी हलवणार का? की “जैसे थे” धोरण कायम राहणार? या प्रश्नाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0
7
6
4
9
9



