Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

बलात्कार व ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता; सरकार पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी

आरोपींच्या वतीने फौजदारी विधीज्ञ ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी बाजू मांडली.

0 8 5 6 2 6

बलात्कार व ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता; सरकार पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी

धाराशिव : प्रतिनिधी

बलात्कार व अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या प्रकरणात माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ठुबे यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने सरकार पक्षाकडून आरोपींविरुद्ध आरोप शंकातीतरीत्या सिद्ध करण्यात अपयश आल्याचे निरीक्षण नोंदवत हा निकाल दिला.

गुन्हा रजिस्टर क्रमांक 54/2022 अंतर्गत आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 376, 376(2), 506, 109 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 चे कलम 3(1)(w) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास डीवायएसपी कार्यालयामार्फत करण्यात आला होता. तपासानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले.

आरोपींच्या वतीने फौजदारी विधीज्ञ ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाच्या साक्षीदारांचा सखोल उलटतपास करताना फिर्याद जाणीवपूर्वक उशिराने दाखल करण्यात आल्याचा तसेच ती खोटी असल्याचा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला. आरोपींना खोट्या गुन्ह्यात गोवण्याच्या उद्देशाने ही फिर्याद दाखल करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकार पक्षाच्या साक्षीदारांच्या सरतपास व उलटतपासातून अनेक बाबी निष्पन्न झाल्या असून आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यास सरकार पक्ष असमर्थ ठरल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच वैद्यकीय पुरावे सरकार पक्षाच्या भूमिकेला पूरक नसल्याचे आणि प्रयोगशाळेला पाठविण्यात आलेल्या नमुन्यांमधूनही आरोपींविरुद्ध कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा समोर आला नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

सरकार पक्षाचा पुरावा, साक्षीदारांचे जबाब आणि बचाव पक्षाचा उलटतपास यांचे सविस्तर परीक्षण केल्यानंतर सरकार पक्ष आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद करत माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ठुबे यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा विशाल साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. अमित गोळे, ॲड. शुभम तांबे, ॲड. संकेत गोरे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. आकाश एडके, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे, ॲड. पृथ्वीराज खोचरे व ॲड. महेश पवार यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे