Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण पुरुष’;महाविकास आघाडीचे रुषीकेश मगर आणि अमोल कुतवळ यांच्या नावांची जोरदार चर्चा…

तुळजापूर नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण पुरुष’;

0 7 6 5 1 9

तुळजापूरात नगराध्यक्षपद‘सर्वसाधारण पुरुष’खुलं!

महाविकास आघाडीचे रुषीकेश मगर आणि अमोल कुतवळ यांच्या नावांची जोरदार चर्चा…

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

राज्य शासनाकडून नुकतीच जाहीर झालेल्या नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत तुळजापूर नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण पुरुष’ प्रवर्गासाठी खुलं झाल्याने शहराच्या राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध राजकीय गटांनी आपल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, इच्छुकांच्या चर्चांनाही उधाण आलं आहे.

काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक अमर मगर यांचे लहान बंधू, अक्रमक आणि तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे रुषीकेश मगर यांचे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. ते माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांचे निकटवर्तीय असून, खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांचेही विश्वासू म्हणून त्यांची राजकीय ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत रुषीकेश मगर हे बलाढ्य दावेदार ठरणार, यात काही शंका नाही.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या गटातूनही तितक्याच ताकदीने एक नाव पुढे येत आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले अमोल कुतवळ हे देखील नगराध्यक्षपदासाठी प्रबळ इच्छुक मानले जात आहेत. नागरिकांच्या अडचणींवर तत्पर प्रतिसाद देणारे कुतवळ हे सामाजिक कार्यातही आघाडीवर आहेत.

या दोन्ही उमेदवारांच्या चर्चेमुळे तुळजापूर शहरातील राजकीय समीकरणात चुरस निर्माण झाली असून, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यावेळी चुरशीची लढत पाहायला मिळेल, अशी चर्चा शहरभर रंगली आहे.

5/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे