ब्रेकिंगमहाराष्ट्र
‘तुळजापूरनामा न्यूज चॅनल’च्या बातमीची दखल; प्रशासनाचे लेखी आश्वासन, उपोषण स्थगित
‘तुळजापूरनामा न्यूज चॅनल’च्या बातमीची दखल; प्रशासनाचे लेखी आश्वासन, उपोषण स्थगित

0
7
6
4
9
6
‘तुळजापूरनामा न्यूज चॅनल’च्या बातमीची दखल; प्रशासनाचे लेखी आश्वासन, उपोषण स्थगित
तुळजापूर,: तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथील सावित्रीबाई शिवराम घोडके यांनी मृत व्यक्तीच्या नावे बनावट ठराव करून मालमत्तेतील नोंदीत फेरफार झाल्याच्या प्रकरणी सुरू केलेल्या उपोषणाची दखल ‘तुळजापूरनामा’ न्यूज चॅनेलच्या बातमीनंतर प्रशासनाने घेतली असून, लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.पंचायत समिती तुळजापूरचे गटविकास अधिकारी हेमंत प्र. भिंगारदेवे यांनी दिलेल्या पत्रानुसार, संबंधित प्रकरणातील ४ मे १९७१ चे अभिलेख व इतर आवश्यक कागदपत्रे तक्रारदारास उपलब्ध करून देण्याचे आदेश ग्रामपंचायतीस देण्यात आले आहेत. अभिलेख उपलब्ध नसल्यास त्याबाबत लेखी माहिती देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.यासोबतच ‘८-अ’ उताऱ्याची पडताळणी करून अतिक्रमणाबाबत कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रकरणाची सखोल चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश विस्तार अधिकारी (पंचायत) यांना देण्यात आले आहेत.

प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सावित्रीबाई घोडके यांनी २० एप्रिलपासून सुरू केलेले उपोषण मागे घेतले असून प्रशासनास सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

0
7
6
4
9
6



