Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर पासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तीकडून फायरिंग; परिसरात खळबळ

तुळजापूर पासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तीकडून फायरिंग; परिसरात खळबळ

0 7 6 4 9 6

तुळजापूर पासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तीकडून फायरिंग; परिसरात खळबळ

तुळजापूर : तुळजापूरपासून काही अंतरावर असलेल्या सारंग बारसमोर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली, तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी फॉरेन्सिक लॅबच्या वाहनांसह तज्ज्ञ पथकही घटनास्थळी पोहोचले होते. परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला असून, गोळीबार नेमका कशासाठी आणि कोणाच्या दिशेने करण्यात आला, याचा तपास सुरू आहे.घटनास्थळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात इसमाने हवेत गोळी झाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या घटनेमुळे तुळजापूर शहर व परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलीस प्रशासनाने तपासाला गती दिली आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

3.5/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे