Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांचे जिगरी मित्र पांडुरंग तारक आई तुळजाभवानीच्या चरणी!

आंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांचे सहकुटुंब दर्शन; साडी-चोळी अर्पण करून महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचे घेतले आशीर्वाद

0 8 5 6 3 0

मनोज जरांगे पाटील यांचे जिगरी मित्र पांडुरंग तारक आई तुळजाभवानीच्या चरणी!

आंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांचे सहकुटुंब दर्शन; साडी-चोळी अर्पण करून महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचे घेतले आशीर्वाद

तुळजापूर | तुळजापूरनामा

मराठा आरक्षण आंदोलक संघर्ष योद्धा मनोज जरांगे -पाटील यांचे जिवलग मित्र तथा आंतरवाली सराटी गावचे सरपंच पांडुरंग तारक यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीला साडी-चोळी अर्पण करून आशीर्वाद घेतले.

पांडुरंग तारक यांच्यासोबत त्यांची पत्नी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सातत्याने कार्यरत असलेले त्यांचे भाचे स्वप्निल यांनीही आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी श्रद्धाभाव व्यक्त केला.

यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब कापसे आणि पोलीस वाहतूक हवालदार माने यांच्यासह अन्य उपस्थित होते.

आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसरात धार्मिक वातावरण पाहायला मिळाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे