Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात तातडीची बैठक घेणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन; “टप्पा अनुदान वाढ मीच दिली”

जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात तातडीची बैठक घेणार!

0 8 5 6 2 6

जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात तातडीची बैठक घेणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन; “टप्पा अनुदान वाढ मीच दिली”

करमाळा | प्रतिनिधी

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीवरून राज्यातील शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता राजकीय पाठबळ मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. जुनी पेन्शन योजनेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तातडीने बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले मंगेश चिवटे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी केलेल्या प्रयत्नांचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी त्यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

“मुख्यमंत्री असताना दोन वेळा टप्पा अनुदान वाढ दिली”

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मी दोन वेळा टप्पा अनुदान वाढ दिली आहे. मंगेश चिवटे हे जुनी पेन्शन योजनेच्या प्रश्नासाठी सातत्याने आग्रह धरत आहेत. या प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीत तसेच जुनी पेन्शन योजनेसाठी लढा देणाऱ्या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.

“७५० कोटींचा खर्च असल्यास तातडीने निर्णय घेऊ”

जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी शासनाला सुमारे ३० हजार कोटी रुपये खर्च येईल, असा काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दावा केला जात असल्याचे मंगेश चिवटे यांनी सांगितले. मात्र, योजना सुरू करण्यासाठी केवळ ७५० कोटी रुपयांची गरज असल्याची माहिती कागदोपत्री अहवालासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावर, “७५० कोटी रुपयांत ही योजना सुरू होत असेल, तर तिला तातडीने मंजुरी देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ,” असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश चिवटे यांना दिल्याचे सांगण्यात आले.

पाच जिल्हे, ५८ तालुक्यांत प्रचार दौरा

पुणे शिक्षक मतदारसंघात येणाऱ्या पाच जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांमध्ये मंगेश चिवटे यांचा प्रचार दौरा पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. या दौऱ्यात शिक्षकांच्या समस्या, जुनी पेन्शन योजना, अनुदान, शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तसेच मतदार नोंदणीवर भर देण्यात येत आहे.

या मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने, खासदार ज्योतीताई वाघमारे, मंत्री शंभूराजे देसाई, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुहास बाबर, आमदार यड्रावकर, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मतदार नोंदणी आणि प्रचाराचे काम करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, स्वाभिमानी शिक्षण-शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अडसूळ सर, कल्याण शेट्टी सर, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे समन्वयक निलेश शेठ राठोड, शिक्षक मित्र महेंद्र लोकरे, प्रचारप्रमुख दीपकराव पाटणे यांच्यासह पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे