Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

आई तुळजाभवानीच्या लाडू प्रसादावर चौकशीचे आदेश!

तुपाच्या लाडू प्रसाद व्यवस्थेबाबतच्या तक्रारींची धर्मादाय आयुक्तांकडून दखल; मंदिर प्रशासनाला सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

0 8 5 6 3 3

आई तुळजाभवानीच्या लाडू प्रसादावर चौकशीचे आदेश!

तुपाच्या लाडू प्रसाद व्यवस्थेबाबतच्या तक्रारींची धर्मादाय आयुक्तांकडून दखल; मंदिर प्रशासनाला सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

तुळजापूर, : तुळजापूर नामा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानातील तुपाच्या लाडू प्रसाद व्यवस्थेबाबत दाखल तक्रारींनी आता प्रशासकीय स्तरावर लक्ष वेधले आहे. या प्रकरणाची दखल घेत सहाय्यक धर्मादाय आयुक्त, धाराशिव यांनी चौकशी व पुढील कार्यवाहीसंदर्भात आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. मंदिर प्रशासनाने तक्रारींची सखोल चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश संबंधित कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत.

◾सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारींची दखल

तुळजापूर येथील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांनी ऑगस्ट २०२६ मध्ये तुपाच्या लाडू प्रसाद व्यवस्थेबाबत महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ आणि ‘पीजी पोर्टल’वर तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयातील निरीक्षकांनी तपासणी करून अहवाल सादर केल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.

या अहवालाच्या अनुषंगाने सहाय्यक धर्मादाय आयुक्त, धाराशिव यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी आदेश पारित केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे अधीक्षक द. अं. जाधव यांनी मंदिर संस्थानच्या अध्यक्षांना पत्र पाठवून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

◾चौकशी करा, अहवाल सादर करा!

प्रसाद व्यवस्थेबाबतच्या तक्रारींची मंदिर प्रशासन अंतर्गत स्तरावर सखोल चौकशी करावी, चौकशीअंती केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, धाराशिव येथे सादर करावा आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशांचे नियमानुसार पालन करावे, असे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

◾ प्रसाद व्यवस्थेतील पारदर्शकतेकडे लक्ष

श्री तुळजाभवानी मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे प्रसादाची गुणवत्ता, खरेदी प्रक्रिया, आर्थिक व्यवहार, किंमत आणि व्यवस्थापनातील पारदर्शकता यांना महत्त्व आहे. तक्रारींच्या अनुषंगाने उपलब्ध अभिलेखांची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कार्यवाही करावी, अशी अपेक्षा तक्रारदाराने व्यक्त केली आहे.

दरम्यान, चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली असली, तरी लाडू प्रसाद व्यवस्थेत गैरप्रकार झाल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. मंदिर प्रशासनाकडून चौकशीत काय निष्पन्न होते आणि त्यानंतर कोणती कार्यवाही केली जाते, याकडे भाविकांसह तुळजापूर व धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे