Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पोलीसांच्या कारभारावर न्यायालयाचा झटका; आनंदनगर प्रकरणात आरोपी निर्दोष, पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

पोलीस स्टेशनमधील मारहाण प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी न्यायालयाचा निर्णय

0 7 6 5 2 0

पोलीस स्टेशनमधील मारहाण प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी न्यायालयाचा निर्णय

धाराशिव : आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यास धक्का देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात आरोपी फरीद इस्माईल शेख यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. येवलेकर यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.सदर प्रकरणात आनंदनगर पोलीस स्टेशनमार्फत आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १८५/२०२३ अंतर्गत भा.दं.वि. कलम ३५३, ३३२, ५०६ अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. पोलीस फिर्यादीनुसार,आरोपीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आल्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबलला ढकलून गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप होता.
मात्र, या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड.विशाल प्रभाकर साखरे यांनी प्रभावी युक्तिवाद करत पोलीस साक्षीदारांच्या साक्षीत विसंगती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पोलीस स्टेशनमध्येच घटना घडल्याचा दावा असला तरी साक्षीदारांच्या जबाबांमध्ये संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच आरोपीने दिलेल्या तक्रारीची योग्य नोंद न झाल्यामुळे त्याने वरिष्ठांकडे दाद मागितल्यानेच त्याच्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याचा मुद्दाही बचाव पक्षाने मांडला. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या दाखल्यांचा आधार घेत, आरोपीविरुद्ध ठोस पुरावे नसल्याचे अधोरेखित करण्यात आले.सर्व साक्षीदार फितूर झाले नसतानाही त्यांच्या साक्षीत निर्माण झालेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.या खटल्यात आरोपीच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड.मंजुषा साखरे,ॲड.महेश लोहार,ॲड.शुभम तांबे,ॲड. संकेत गोरे,ॲड.अर्चना कांबळे, ॲड.लक्ष्मीकांत कुलकर्णी,ॲड. अमित गोळे,ॲड.आकाश येडके, ॲड.ओंकार कोरेगावकर,ॲड.रोहित लोमटे, ॲड.पृथ्वीराज खोचरे,ॲड. महेश पवार आदींनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे