तुळजापूर पंचायत समितीत कर्मचारी युनियनची सर्वानुमते निवड !
रोहित पवार तालुका अध्यक्ष; तुळजापूर शाखेची नवी टीम जाहीर.
तुळजापूर पंचायत समितीत कर्मचारी युनियनची सर्वानुमते निवड !
रोहित पवार तालुका अध्यक्ष; तुळजापूर शाखेची नवी टीम जाहीर.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
पंचायत समिती सभागृहात दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (मुख्यालय सोलापुर), जिल्हा शाखा धाराशिव यांच्या वतीने पंचायत समिती तुळजापूर शाखेची नुतन कार्यकारिणी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
▪️ रोहित राजेंद्र पवार-तालुका अध्यक्ष
▪️श्रीमती सावित्री यादव- तालुका उपाध्यक्ष
▪️श्रीमती अंजी शिंदे- तालुका उपाध्यक्ष
▪️ चितानंद स्वामी-कोषाध्यक्ष
▪️विजयानंद सगर-सह कोषाध्यक्ष
▪️बुद्धार्थ झाकडे-कार्याध्यक्ष
▪️अंकुश लाखाडे-कार्याध्यक्ष
▪️रामेश्वर सुळे-सचिव
▪️ विजयकुमार मेनकुदळे-सह सचिव
▪️श्रीमती सुवर्णा वैद्य-प्रसिद्धी प्रमुख
▪️ राहीदास जाधव-तालुका समन्वयक
▪️ ज्ञानेश्वर काळे-तालुका संपर्कप्रमुख
▪️ मिलिंद कांबळे-वित्त संघटना प्रतिनिधी
▪️श्रीमती वैशाली पाटील-वित्त संघटना प्रतिनिधी
▪️श्रीमती कौशल्या सरडे- महिला संघटक
▪️श्रीमती रेश्मा चांदणे-महिला संघटक
▪️किरण सावंत-परिचर संघटना प्रमुख
▪️अभिजीत शिंदे-परिचर संघटना प्रमुख

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषीकेश पिंपळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी यांनी केले. या वेळी रामदास जगताप, सहाय्यक लेखा अधिकारी तथा धाराशिव जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष; सुखदेव पांडागळे, उमादेवी मगर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी तसेच पंचायत समिती तुळजापूर अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यकारिणीच्या निवडीमुळे कर्मचारी संघटनेच्या उपक्रमांना अधिक वेग मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.



